Yogesh tilekar biography of donald
– विवेकानंद काटमोरे (प्रतिनिधी)
हडपसर – योगेश पुंडलिक टिळेकर भाजपचे माजी आमदार, सध्याचे विधानपरिषद सदस्य गत विधानसभा निवडणुकीत मतदार संघात झालेल्या निसटत्या पराभवानंतरही पक्षाशी एकनिष्ट राहून केलेले काम. पक्षाने टाकलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून वाढवलेले पक्ष संघटन त्याचे बक्षिस त्यांना आता मिळत आहे.
सन २०१४ ला हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारीला सार्थ ठरवत मिळविलेला विजय आणि आता थेट विधानपरिषद सदस्य म्हणून वर्णी.
त्यामुळे योगेश टिळेकर यांच्यासाठी आजचा क्षण हा राजकारणातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे. वर्गाचा मॉनिटर ते विधान परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण कोंढवा गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण करून पुढे पाचवी ते दहावी भोसरी येथील हायस्कूलमध्ये पूर्ण केली. योगेशने शिकून खूप मोठे व्हावे ही आई रंजनानानी टिळेकर यांची भावना, तर ‘दम बडी चीज है’ वडील पुंडलिक दादा टिळेकर यांची शिकवण.
इयत्ता पाचवीला असतानाच संघ शाखेला जोडल्याने समाज कळू लागलेल्या योगेश टिळकरांनी पुढे आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली.
वर्गातील हुशार विद्यार्थी असल्याने मॉनिटर, खो-खो खेळात उत्तम खेळाडू असल्याने कॅप्टन झालेल्या योगेश टिळेकरांकडे संघटन कौशल्य असल्याने त्यांनी १२ वीत असतानाच पतित पावन संघटनेचे काम सुरू केले.
सन १९९४ ला जनहित सेवा संघटना काढून अकरावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन विविध स्पर्धा,मार्गदर्शन मेळावे, शिबिरे यांचे आयोजन केले. गावच्या विकासात सहभाग नोंदवत गटारे साफसफाई करणे ,मंदिराची साफसफाई करणे ,अडीअडचणीत असलेल्या नागरिकांना तात्काळ मदत करणे. यातून जनसंपर्क वाढत जावून लोकांचा पाठिंबा मिळत गेला.
१९९६ ला भारतीय जनता पक्षाचा कोंढवा गावचा अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थाने योगेश टिळेकर यांच्या राजकीय कार्याला सुरुवात झाली.
९७ ला हडपसर युवा मोर्चाचे सचिव , तर २००० ला सरचिटणीस राहिलेल्या टिळेकरांना २००२ मध्ये आई रंजना टिळेकर यांना भाजप कडून महापालिका निवडणुकीत संधी मिळाली विजयाने त्या संधीचे सोने करून योगेश टिळेकर यांनी राजकारणात मुहूर्तमेढ रोवली खरी, मात्र प्रत्यक्षात संघर्षाची सुरुवातही त्याच वेळी झाली.
विरोधकांचा आणि सोबतीला असलेल्या अनेकांनी या काळात वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केल्याने काही काळ राजकारण नकोसे वाटणाऱ्या टिळेकरांनी पुन्हा जनतेच्या आग्रहाखातर २००७ मध्ये आईच्या रूपाने महापालिकेत विजय मिळविला.
त्यानंतर त्यांनी राजकारणात मजल दरमजल पुढे जात गेले. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती होती त्यात युतीच्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करून मताधिक्य दिले.
दरम्यान याच काळात मोठ्या राजकीय संघर्षाला ही सामोरे जावे लागले पुढे पक्षाने उमेदवारी दिल्याने सन २०१२ ला पुणे महानगरपालिकेचे निवडणूक लढवून ती भरघोस मतांनी जिंकली.
सन २०१४ ला युती तुटली आणि हडपसर विधानसभेची संधी योगेश टिळेकर यांना मिळाली. मुळात आमदार व्हायची इच्छा नव्हती, मात्र मागील काळात झालेला त्रास आणि राजकीय इर्षा या पोटी केवळ जनतेच्या आग्रहाखातर ही संधी स्वीकारून तिचे विजयात रूपांतर केल्याचे प्रांजळ कबुली योगेश टिळेकर यांनी दिली.
महापालिकेत नगरसेवक आणि विधानसभेत आमदार म्हणून दमदार कामगिरी या काळात करता आली.
पुढे पुन्हा २०१७ ला नानी टिळेकर या भागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत टिळेकरांना अपघाताने निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान पक्षाने विश्वास ठेवत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाचे ही प्रदेशाध्यक्ष पद दिले यातून टिळेकरांनी राज्यभर पक्ष संघटन वाढविण्याचे काम केले.
विधानसभेत पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा जनतेत जाऊन काम करणारे योगेश टिळेकर कोरोना महामारीच्या काळात कुटुंबासह रस्त्यावर उतरून मदत करण्यासाठी धावून गेले.
आई नगरसेवक, स्वतः नगरसेवक आणि आमदार झाल्यानंतर कोंढवा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे टिळेकरांनी केली कोंढवा भागात तीन पाण्याच्या टाक्या ,तीन उद्याने ,स्विमिंग पूल, भाजी मंडई उभारली.
कात्रज चौकात पोतराज आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या योगेश टिळेकरांनी नवले ब्रिज ते लोणीकंद असा ५४८ हा राष्ट्रीय महामार्ग करून घेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नॅचरोपॅथी हॉस्पिटल ,आनंदवन गार्डन ,ससाणे नगर ,काळेपडळ ,रामटेकडी येथे रेल्वे अंडरपास, हडपसरला मेट्रो आणावी यासाठी प्रस्ताव, काळेपडळ येथील वन विभागाच्या जागेला संरक्षित कुंपण ,खाणीत स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणीचे प्रयत्न ,मांजरी रेल्वे उड्डाणपूल, मांजरी नदीवरील पूल ,मांजरी मुख्यमंत्री पेयजल योजना ,केशवनगर ते भापकर मळा रस्त्याचे रुंदीकरण, मुंढवा- घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल यासारखी शेकडो विकास कामे कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून पूर्ण केल्याचा दावा योगेश टिळेकर यांनी आवर्जून केला आहे.
दम बडी चीज है !
समाजकारण आणि राजकारण करत असताना येणारा संघर्ष हा ठरलेला असतो परंतु या संघर्षातही जनतेची नाळ कायम ठेवून सामाजिक कार्य करत राहिल्यास एक ना एक दिवस यश नक्की मिळते.
यासाठी वडील स्वर्गीय पुंडलिक दादा टिळेकर हे नेहमी सांगायचे की योगेश दम बडी चीज है आज दादांनी दिलेल्या या शिकवणीचा प्रत्यय येतो आहे.
राजकारण किंवा समाजकारण करत असताना विरोधक आणि काही जवळच्या लोकांनी वेळोवेळी खोटी बदनामी करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेचा आशीर्वाद आणि पक्षाने दाखवलेला विश्वास हा या निवडीतून दिसून येत आहे.
– योगेश टिळेकर आमदार, विधानपरिषद.
Tags:bjpclass monitorlegislative council memberMAHARASHTRApune newsStruggling journeyyogesh tilekar